Pages

Tuesday, October 15, 2019

!

(Arranged Marriage) लग्न हा एक आंधळा जुगार आहे. जिंकण्याची उमेद किवा सपशेल हरण्याची तयारी असल्याशिवाय तो खेळू नाही अस म्हणतात.

पण मैत्री ? मैत्री ही करण्याची गोष्ट आहे की होण्याची ? मित्र शोधायचा असतो की सापडतो ? चांगल्या मैत्रीत भ्रमनिरास झाले तरी हरकत नाही. कारण खऱ्या मैत्रीत कितीही वादळ आली, तरी ती भावना मुळात खरी होती याच समाधान संपूर्ण आयुष्य जगायला ही पुरेस असत. बरोबर घालवलेला चांगला काळ हा आयुष्यभराचा दिलासा बनु शकतो.

"आणि कितीही वेगळे असलो तरी आम्ही मित्र झालो।" आणि उद्या आम्ही शत्रुही झालो तरी अनेक मतभेद आमच्यात होतील आणि ते वैधहि असतील। पण ते म्हणतात तस,

In your friend, you should possess your best enemy.
Your heart should feel closest to him, even when you oppose him.

आणि एक दिवस असाही येईल जेव्हा आम्ही एकमेकांना पूर्ण समजू।

May be then, I will have a different colour and a different name.

पण तूर्तास,

When you part from your friend, you grieve not!
for that which you love most in him, may be clearer in his absence,
as the mountain to the climber is clearer from the plane and
let there be no purpose in friendship, save the deepening of the spirit.
- Khalil Gibran

"येऊ आपण परत, एकमेकांना ओळखल म्हणजे झाल!"
मित्र शोधायचा असतो, की सापडतो?,
कदाचित तो ओळखायचा असतो!

No comments:

Post a Comment