प्रिय बेथ,
सुख दुःख, हर्ष विषाद, आशा निराशा,
साऱ्या मानवी भावना जेथे लाटा होऊन फुटतात,
कालनदीच्या त्या किनाऱ्यावर,
तुझी शांत, सोशिक, समंजस पावले,
त्या अनिवार्य अंतिम क्षणाची वाट बघत,
तिष्ठत उभी आहेत!
चिंतांच्या अणि संघर्षांच्या पार जाण्यास,
सज्ज झालेल्या माझ्या लाडके,
ज्या सदगुणांनी तुझे जीवन सुन्दर केले,
ते सारे जाताना मला देऊन जा!
ती सहनशीलता, ती आनंदी वृत्ती,
आणि
शरीरवेदनेच्या पिंजऱ्यातही निर्भय राहिलेला तो आत्मा!
सारे मला देऊन जा!
माला देऊन जा ते धैर्य, तो समजूतदार गोडवा,
ती कर्तव्यदक्षता -
ज्यानी तुझ्या पायांखालच्या वाटेवर
सतत उगवती ठेवली हिरवीगार हिरवळ,
आणि उमलऊन आली असंख्य चिमुकली फुले,
मला देऊन जा तो निःस्वार्थीपणा आणि ते आसिम औदार्य,
जे सतत क्षमाशील होते जगाशी, केवळ प्रेमाखातर,
अशारीतिने या अंतिम वियोगाच्या क्षणिहि,
येतच आहोत आपण अधिक जवळ,
आणि विरहदुःखाच्या कडवटपणात,
भरते आहे काहीतरी मधुर, सुन्दर!
या दुःखाच्या स्पर्शाने विरघळून जेल माझा कठोरपणा,
आणि होईल, आद्याताविषयीच्या गाढ़ श्रद्धेचा उदय!
तू नदीपर जाशील, आणि त्या पलीकडच्या तीरावर
तिष्ठत राहशील माझ्यासाठी,
जेव्हा आशा आणि श्रद्धा यांचे सौरक्षक देवदूत,
माझ्यासाठी धाडून,
एके दिवशी मलाही नेशील तू आपल्याकडे,
त्या स्वर्गीय सुन्दर, जगपलीकडच्या जगात!
Marathi translation of one of the poems from
Luisa May Alcott's Little Women!