Pages

Thursday, April 25, 2013

Poem about some saints and legends in Marathi Language!!

माझ्या भाषेची कवने, सखे गाऊ तरी किती /
शब्दाछंदांची ग गोडी, तिच्या वर्णू तरी किती //

शिलालेखे गवसल्या, तिच्या बाळ पाऊलखुणा /
गाठी युगांची पुण्याई, देवभाषा असे माता //

वय इतुके कोवळे, त्यास ज्ञानाची झालर /
स्वयं कृष्ण कानी, बोले तेव्हा घडे ज्ञानेश्वर //

रूप मनात ठसले, डोळा विठ्ठलाची आस /
तुका प्रबोधनी झिजे, करी वैकुंठ प्रवास //

कानी टापांची चाहूल, ओठी सूर पोवाड्याचे /
राज्य मराठीचे  खास, गाणे शूर शिवरायाचे //

हाती लोखंडाची बेडी, माता भासे असहाय /
यज्ञ क्रांतीचा मांडीला, तिच्या मुक्तीचे सायास //

शब्द मधाचे करोनी, वर साखर पेरली /
भाषा लावण्याची मुर्ती, शांता बाईंच्या लेखणी //

युगे किती उलटली, आता ग्रेस काव्य करी /
भारावून तरुणाई,शब्द सुरात साठवी //

ठेवा मराठी भाषेचा, सारे मिळून जपूया /
तंत्रज्ञानाच्या जोडीने भाषा ऐटीत बोलूया !!

- निर्झरा वेरुळकर
Poem about some saints and legends in Marathi Language!! and how they contributed to the beautiful language  that we speak today!!





2 comments:

  1. Dnyaneshwar, Tukaram, Raje Shivaji, Vir Savarkar, Shantabai, kavi Grace. Wah apratim!!!

    ReplyDelete